विशेष प्रतिनिधी
दिल्ली : नुकताच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये टायटॅनिक स्टार लिओनार्डो डिकॅप्रियो जेफ बेझोस यांची गर्लफ्रेंड सोबत बोलताना दिसून येतो येत होता. आर्ट गाला ह्या कार्यक्रमात शूट केलेला हा व्हिडीओ होता. एक फॅन गर्ल मोमेंट लॉरेन सांचेझ न्जॉय करत होती. पण नेटकऱ्यांनी या व्हिडिओला डोक्यावर घेतले होते.
Jeff Bezof reacts to viral video of Titanic star Leonardo DiCaprio and Lauren Sanchez
बऱ्याच लोकांना असे वाटत होते की, लिओनार्डो डिकॅप्रियो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझॉस याच्या गर्लफ्रेंडसोबत फ्लॅट करतोय. तर बऱ्याच लोकांना असे वाटत होते की, जेफची गर्लफ्रेंडने आपल्या सर्वात आवडत्या अभिनेत्याला भेटल्यानंतर आपल्या बॉयफ्रेंडला चक्क इग्नोर केले. अशा बऱयाच उलटसुलट चर्चा मीडियामध्ये रंगल्या होत्या. यावर बरेच मीम्स देखील बनवले गेले आणि ते व्हायरल झाले होते.
या सर्व गोष्टींनंतर जेफ बेझॉस यांची प्रतिक्रिया काय असणार याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. नुकताच जेफ बेझोस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामधून त्यांनी लिओनार्डो डिकॅप्रियो ला एक प्रकारचे आव्हानच दिले आहे.
Jokes apart. असं काही अजिबात नाहीये. जेफ बेझॉस एका जंगलामध्ये फिरायला गेलेले असताना तिथे एक बोर्ड समोर त्यांनी स्वतःच एक फोटो घेतला होता. त्या बोर्डवर लिहिले होते, ‘डेंजर स्टीप क्लिफ, फँटल ड्रॉप’ हा फोटो त्यांनी शेअर करत लिओनार्डो डिकॅप्रियोला या फोटोमध्ये टॅग केले आहे. अतिशय विनोदी पद्धतीने त्यांनी जगातल्या सर्व नेटकऱ्यांच्या मजेशीर उत्तर दिले आहे. आणि इंटरनेट पून्हा एकदा हे ट्विट रिट्विट करण्यात गुंतले आहे, असे दिसतेय.
Jeff Bezof reacts to viral video of Titanic star Leonardo DiCaprio and Lauren Sanchez
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल