विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. रावण हे पात्र त्यांनी इतके उत्तमरित्या साकारले होते की इतर कोणी ही भूमिका इतकी लीलया करू शकेल असा आपण विचारही करू शकत नाही. पण ही आयकॉनिक भूमिका त्यांना योगायोगाने मिळाली होती.
Death of legend Arvind Trivedi, Accidentally got Ravan role but he auditioned for different role in Ramayana
अशी मिळाली अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका :
अरविंद त्रिवेदी यांनी ‘केवट’ या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. रामायणामध्ये केवट हा नाविक राम लक्ष्मण आणि सीता यांना त्यांच्या वनवासकाळात गंगा पार करण्यास मदत करतो. अरविंद त्रिवेदी म्हणाले होते की, मी रामानंद सागर यांच्याकडे केवट या रामभक्ताच्या भूमिकेसाठी गेलो होतो. रामानंद सागर यांनी त्यांना केवट च्या भूमिकेत न बघता हा रावणाच्या भूमिकेसाठी उत्तम असेल हे ओळखले. त्रिवेदी यांनी सांगितले होते की, मला बघितल्यावर रामानंद सागर म्हणाले, मला माझा लंकेश रावण सापडला आहे.
नकारात्मक भूमिका असलेली ही त्यांची पहिलीच भूमिका आहे. त्यांनी सुमारे 250 चित्रपटांमध्ये काम केले आणि त्या सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
Death of legend Arvind Trivedi, Accidentally got Ravan role but he auditioned for different role in Ramayana
महत्त्वाच्या बातम्या
- ZP Election Result 2021: पालघरचे सर्व निकाल जाहीर; भाजपा तीन, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा, माकपा एका जागेवर विजयी
- देशात पहिल्यांदाच बलात्कार प्रकरणाच्या खटल्यात पाचव्या दिवशी शिक्षा, नराधमाला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाखांचा दंड
- Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त
- शिरपूर पंचायत समितीची पोटनिवडणूक; भाजपचा सर्व सहाच्या सहा जागांवर विजय