• Download App
    आपण हिंदू की मुसलमान? आपल्या मुलांच्या ह्या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, 'आपण भारतीय आहोत, मानवता हा आपला धर्म' | Are you a Hindu or a Muslim? To this question of his children, Shah Rukh says, 'We are Indians, humanity is our religion'

    आपण हिंदू की मुसलमान? आपल्या मुलांच्या ह्या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, ‘आपण भारतीय आहोत, मानवता हा आपला धर्म’

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. हे प्रकरण चांगलेच मिडीयामध्ये गाजले होते. या प्रकरणावर भाष्य करताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणाची चौकशी करणार्या समीर वानखेडे या अधिकार्यांवर मोठे आरोप केले होते. हे आरोप अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन करण्यात अाले हाेते. समीर वानखडे यांचा धर्म कोणता? त्यांची आई मुस्लिम धर्माची होती…त्यांच्या वडीलांचे नाव दाऊद आहे…समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला अशा बऱ्याच गोष्टी मीडियामध्ये आल्या होत्या.

    Are you a Hindu or a Muslim? To this question of his children, Shah Rukh says, ‘We are Indians, humanity is our religion’

    या सर्व गोष्टींनंतर अभिनेता शाहरुख खान याचा एक जुना इंटरव्यू सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या इंटरव्ह्यूमध्ये शाहरुख खान सांगतोय, जेव्हा मला माझी मुलं आपला धर्म कोणता? हा प्रश्न विचारायचे त्यावेळी मी त्यांना सांगायचो, आपण सर्वात पहिल्यांदा भारतीय आहोत. मानवता हा आपला धर्म आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान कि औलाद है इन्सान बनेगा’ या गाण्याचा रेफरन्सदेखील तो आपल्या मुलांना द्यायचा असे त्याने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे.


    आर्यनसाठी जुही चावला झाली जामीनदार, वाचा शाहरुख खान आणि जुहीची केमिस्ट्री ?


    शाहरुख खान हा मुस्लीम धर्मीय आहेत. त्याची पत्नी गौरी ही हिंदू आहे. शाहरुख खानच्या एका मुलाचे नाव आर्यन, मुलीचे नाव सुहाना आणि त्याच्या तिसऱ्या मुलाचे नाव ‘अबराम’ असे आहे. आपल्या तिसर्या मुलाचे नाव अबराम का ठेवले? हे सांगताना तो या मुलाखतीत म्हणतो, ‘हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्माचे प्रतिनिधित्व करणारे नाव मी माझ्या मुलाचे ठेवले आहे. आणि मला नेहमीच असे वाटत होते की, भारतीयांच्या लक्षात राहणार अशी आपण आपल्या मुलांची नावे ठेवली पाहिजेत.’

    Are you a Hindu or a Muslim? To this question of his children, Shah Rukh says, ‘We are Indians, humanity is our religion’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी