• Download App
    पवारांच्या यूपीए चेअरमन पदाच्या चर्चेचा फुगा तारिक अन्वरांनी फोडला | The Focus India

    पवारांच्या यूपीए चेअरमन पदाच्या चर्चेचा फुगा तारिक अन्वरांनी फोडला

    • पवारांच्या यूपीएचे चेअरमन नियुक्तीचा विषय सोडा; त्याबाबत कोणतीच चर्चाही नाही; काँग्रेस नेते तारिक अन्वर यांचा स्पष्ट खुलासा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवार सोनिया गांधींच्या जागी यूपीएचे चेअरमन होणार अशा चर्चा नुसत्या दिल्लीत पसरल्या किंवा पसरवल्या गेल्या, तर काँग्रेस नेत्यांनी पुढे येऊन त्या चर्चांचा फुगा फार उंच हवेत उडण्यापूर्वीच फोडून टाकला. हे काम करायला काँग्रेसने पवारांचेच जुने बंडखोर सहकारी तारिक अन्वर यांना खुलासा करण्यासाठी “प्लेस” केले. ariq anwar brusts sharad pawar

    शरद पवार हे सोनिया गांधींच्या जागी संयुक्त पुरोगामी आघाडीचे अर्थात यूपीएचे चेअरमन होण्याची दुपारी जोरदार चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आनंदाच्या प्रतिक्रिया व्यक्त करून काही वेळ उलटतो ना उलटतो तोच काँग्रेसने मात्र त्यावर थेट प्रतिक्रिया व्यक्त करत चर्चेचा फुगा फोडून टाकला. ariq anwar brusts sharad pawar

    पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याचा विषय सोडा, त्याबाबत कोणतीच चर्चाही झालेली नाही, असे पवारांचे जुने राष्ट्रवादीतले सहकारी तारिक अन्वर यांनी स्पष्ट केले. वर या बातमीत काहीही तथ्य नाही. खुद्द पवारांनाही अशा प्रकारची चर्चा सुरू असल्याचे माहिती नसेल, अशी मखलाशी केली.

    तारिक अन्वर म्हणाले, “जाणूनबुजून अशा बातम्या पेरल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून या वावड्या उठवण्यात आल्या आहेत. पंरतु, वास्तवाशी या बातमीचा काहीच संबंध नाही. या बातमीत काहीच तथ्य नाही.”

    वास्तविक पाहता पवारांच्या बातम्या पेरण्याशी शेतकरी आंदोलनाचा काहीही संबंध नव्हता. ते सोनियांना रिप्लेस करणार म्हटल्यावर काँग्रेसजनांचे कान उभे राहिले. त्यातही गांधी परिवार पवारांसाठी एक पाऊल मागे घेणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यातूनही काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली.

    ariq anwar brusts sharad pawar

    त्यातूनच पवारांबरोबर १९९९ साली सोनियांविरोधात बंड करून बाहेर पडलेले नेते तारिक अन्वर यांची खुलासा करण्यासाठी निवड काँग्रेसने केली. आणि त्यांनीच पुढे येऊन शरद पवारांचा यूपीए चेअरमन बनण्याच्या चर्चेचा फुगा फोडून टाकला.

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी