PLI For Domestic Production Of Battery Storage : एकीकडे कोरोना महामारीशी लढा सुरू असतानाच दुसरीकडे देशाची आत्मनिर्भरतेकडेही वाटचाल सुरू आहे. याच दृष्टीने पाऊल टाकत केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रिक कार बॅटरीच्या देशांतर्गत उत्पादनासाठी तब्बल 18 हजार कोटींच्या प्रोत्साहन योजनेस मंजुरी दिली आहे. यामुळे भारतात 50,000 मेगावॅटचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. Atmanirbhar Bharat Modi Cabinet Approved 18000 crore PLI For Domestic Production Of Battery Storage
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एकीकडे कोरोना महामारीशी लढा सुरू असतानाच दुसरीकडे देशाची आत्मनिर्भरतेकडेही वाटचाल सुरू आहे. याच दृष्टीने पाऊल टाकत केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रिक कार बॅटरीच्या देशांतर्गत उत्पादनासाठी तब्बल 18 हजार कोटींच्या प्रोत्साहन योजनेस मंजुरी दिली आहे. यामुळे भारतात 50,000 मेगावॅटचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे
या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले की, बॅटरी स्टोरेज अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण 20 हजार कोटींची बॅटरी स्टोअरेज उपकरणे आयात करतो. परंतु आज जाहीर झालेल्या नवीन पीएलआयमुळे ही आयात कमी होईल, तसेच भारतात उत्पादनही सुरू होईल.
यामुळे विद्युत वाहनांना मोठा चालना मिळेल, असे जावडेकर म्हणाले. आज दीर्घकाळ टिकणारी आणि वेगवान चार्जिंग होणारी बॅटरी ही काळाची गरज आहे. याव्यतिरिक्त भारतात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन झाले आहेत. यामाध्यमातून तब्बल 1,36,000 मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली जात आहे, परंतु आपण ही वीज दिवसाच वापरू शकतो, रात्री नाही. त्यामध्ये ग्रीड संतुलित करायचे असेल तर बर्याच गोष्टी कराव्या लागतात, परंतु याऐवजी बॅटरी स्टोरेज असेल तर हे काम सोपे होईल. शिपिंग आणि रेल्वेमध्ये बॅटरी स्टोरेज खूप उपयुक्त ठरेल. बॅटरी स्टोरेज हे डिझेल जनरेटरचाही पर्याय ठरतील.
Atmanirbhar Bharat Modi Cabinet Approved 18000 crore PLI For Domestic Production Of Battery Storage
महत्त्वाच्या बातम्या
- मोठा निर्णय : DRDOच्या ऑक्सिकेयर सिस्टिम खरेदीला पीएम केअर्स फंडची मंजुरी, दीड लाख युनिटची करणार खरेदी
- मूडीजने घटवला भारताचा जीडीपी वाढीचा दर, जूननंतर अर्थव्यवस्था पुन्हा बहरण्याचे भाकीत
- देशात आणीबाणी लागू करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची याचिकेद्वारे मागणी, मद्रास हायकोर्टाने फेटाळली
- पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार, संशयित हल्लेखोराला अटक
- रुची सोयाकडून बाबा रामदेव यांच्या बिस्किट कंपनीची खरेदी, 60.02 कोटी रुपयांचा व्यवहार