मुंबईतल्या बकासुराच्या विरोधात महायुतीचा बलभीम सज्ज; एकनाथ शिंदेंची गर्जना
शिवसेना भाजपा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुती पदाधिकारी मेळावा आज मुंबईतील वरळी डोम येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.