operation sindoor दरम्यान अवघ्या चार दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला चांगलेच ठोकून काढल्यानंतर सगळ्या भारतात त्याचा आनंद झालेला दिसतोय, पण पाकिस्तानला धुतल्यामुळे इथली लिबरल जमात मात्र दुःखात लोटली गेली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित करून देखील लिबरल जमातीचे दुःख कमी व्हायला तयार नाही, याचेच प्रत्यंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यातून आज आले. मेहबूबा मुफ्ती यांच्या गळ्यातून आज पाकिस्तानी सूर उमटले. सिंधू जल करार स्थगित करून भारत सरकारने चूक केली. ती चूक सरकारने सुधारावी, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी आज केली.