राहुल गांधींना बाकीच्या विरोधकांकडून “लांबून” पाठिंबा; आदित्य ठाकरे सोडून बाकीचे विरोधक अजून vote chori चे प्रेझेंटेशन का नाही करत??
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात इंदिरा भवन मध्ये पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्यांदा vote chori चे प्रेझेंटेशन केले. याआधी त्यांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वोट चोरी झाली, असा आरोप करणारे मोठे प्रेझेंटेशन केले होते. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हरियाणा मध्ये वोट चोरी करून भाजपचे सरकार आणले गेले, असा आरोप केला.