आता उरले अदानींपुरते!!
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार ना कुठल्या वाटाघाटींमध्ये भाग घेत आहेत, ना त्यांनी कुठल्या सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पण उद्या बारामतीत होणाऱ्या गौतम अदानींच्या कार्यक्रमाला मात्र पवार हजर राहणार आहेत. पवारांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण हालचालींवरूनच आता उरले अदानींपुरते असे म्हणायची वेळ आली आहे.