Operation Sindhu : ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत मोठा दिलासा; इराणकडून भारतासाठी हवाई मार्ग खुला, १,००० भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा
इराण-इस्त्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. इराणने भारतासाठी अपवादात्मक निर्णय घेत, आपले हवाई क्षेत्र खुलं केल्याने ‘ऑपरेशन सिंधू’च्या दुसऱ्या टप्प्यास गती मिळाली असून, सुमारे १,००० अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या भारतात पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.