CP Radhakrishnan : सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती असतील; NDA उमेदवाराला 452 मते मिळाली
सीपी राधाकृष्णन हे देशाचे १५ वे उपराष्ट्रपती असतील. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. तर आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली. राधाकृष्णन १५२ मतांच्या फरकाने विजयी झाले.