Prime Minister : पंतप्रधान आजपासून अमेरिकेत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार; महत्त्वाचे करार होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून दोन दिवसांच्या ऐतिहासिक अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या या भेटीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. यामध्ये व्यवसायाचा मुद्दा वरच्या क्रमांकावर असणार आहे.