CM Fadnavis : भाजपच्या दिल्ली विजयावर CM फडणवीस म्हणाले- अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला; खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करण्याच्या परंपरेचा अंत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयामु्ळे अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला असून, खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याच्या परंपरेचा आज अंत झाला आहे, असे ते म्हणालेत.