DRDO : ओडिशाच्या किनाऱ्यावर DRDOने हवाई संरक्षण प्रणालीची केली यशस्वी चाचणी
देशाच्या सशस्त्र दलांना मजबूत आणि सक्षम बनवण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. दरम्यान, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून हवाई संरक्षण प्रणालीच्या (VSHORADS) सलग तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमध्ये, कमी उंचीवर उच्च वेगाने उडणाऱ्या लक्ष्यांना लक्ष्य करण्यात आले. तिन्ही चाचण्यांमध्ये क्षेपणास्त्रांनी त्यांचे लक्ष्य पूर्णपणे नष्ट केले आणि अशा प्रकारे तिन्ही चाचण्या पूर्णपणे यशस्वी झाल्या.