Telangana : तेलंगणा नंतर आता ‘या’ राज्यातही मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजानसाठी विशेष सूट
तेलंगणा नंतर आता आंध्र प्रदेश सरकारनेही सर्व मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात नमाज अदा करण्यासाठी कार्यालयातून लवकर निघण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारने घेतलेल्या अशाच एका पावलानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीनुसार, रमजानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना लवकर कार्यालय सोडण्याची पद्धत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अनेक वर्षांपासून सुरू आहे.