Yogi Adityanath : दंगेखोरांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील असा धडा शिकवू, बरेली हिंसाचारावर योगी आदित्यनाथ यांचा संताप
दंगेखोरांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील असा धडा शिकवू असा इशारा देत बरेली हिंसाचारावर योगी आदित्यनाथ यांनी संताप व्यक्त केला आहे.उत्तर प्रदेशातील बरेली येथे “I Love Muhammad” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ‘एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट मौलाना तौकीर रझा यांच्यावर निशाणा साधला.