PM Modi : पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
पुलवामामध्ये सहा वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक सैनिक शहीद झाले होते. यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, मोदी सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण घेऊन पुढे जात आहे आणि आम्ही दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहोत.