Mumbai : मुंबईत कर्करोगग्रस्त आजीला कचराकुंडीत फेकणाऱ्या नातवाला अखेर अटक
मुंबईत कर्करोगग्रस्त आजीला कचराकुंडीत फेकणाऱ्या नातवाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी नातू, मेहुणा आणि रिक्षाचालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे राहुल शेवाळे (नातू), बाबा साहेब गायकवाड आणि संजय कद्रेशिम अशी आहेत. त्वचेच्या कर्करोगाने ग्रस्त वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तिला जिवंत कचराकुंडीत फेकण्यात आले.