पवारांना आपल्या “डोक्यावरच्या” पदावर बसवून घ्यायला मोदी एवढे “राजकीय मूढ” आहेत का??
केंद्रामध्ये मोदी सरकारच्या राजकारणाच्या ॲडजस्टमेंट मध्ये राज्यमंत्रीपद टिकवलेल्या रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट राष्ट्रपतीपदावर बसवून टाकले. यातून त्यांनी शरद पवारांना टोला हाणला, टोमणा मारला की त्यांच्या जखमेवर मीठ चोळले??, हा सवाल तर तयार झालाच, पण त्या पलीकडे जाऊन शरद पवार यांच्यासारख्या अतिउपद्रवी आणि अतिउपद्व्यापी राजकारण्याला आपल्या डोक्यावरच्या पदावर बसवून घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे “राजकीय मूढ” आहेत का?