Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये तब्बल ३२ लाखांचा इनाम असलेल्या सात नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
कुप्रसिद्ध टेकलगुडेम नक्षलवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका जोडप्यासह सात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण ३२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. २०२१ मध्ये टेकलगुडम नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २२ सैनिक शहीद झाले होते.