Commander Vyomika Singh : अखिलेश यादव यांच्या काकांचा निर्लज्जपणा; सैन्यातील अधिकाऱ्यांची काढली जात, विंग कमांडर व्योमिका सिंगबद्दल वादग्रस्त वक्तव्य
देशासाठी झटणाऱ्या वीर अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याऐवजी, समाजवादी पक्षाचे नेते आणि अखिलेश यादव यांचे काका रामगोपाल यादव यांनी थेट सैन्यातील अधिकाऱ्यांची जात काढून खळबळजनक विधान केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये योगदान देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांविषयी अशा प्रकारची वादग्रस्त टिप्पणी करून त्यांनी स्वतःचा आणि पक्षाचाही पातळी दाखविल्याचा आरोप होत आहे.