भाजपने तीन राज्यांमध्ये राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची केली नियुक्ती!
भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची’ नियुक्ती केली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, हर्ष मल्होत्रा आणि माजी केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना अनुक्रमे वरील तीन राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.