Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना अपात्र ठरवले तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल; नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे निरीक्षण
देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये कृषिमंत्री असलेली माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची होणारी कारवाई टळली आहे. मात्र, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना जे निरीक्षण नोंदवलेले ते निरीक्षण आता चर्चेत आले आहे.