Chief Minister Fadnavis : विकासाच्या इकोसिस्टीमुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री यांनी सांगितले की, राज्यात रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग, बंदरे आणि विमानतळ यांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ‘विकासाच्या इकोसिस्टीम’मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असून 2028 पर्यंत प्रवास शक्य होईल. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाईल.