Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मीडियालाच घाई, अजित पवार म्हणाले चर्चा झालीच नाही!
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दाेन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले, वृत्तवाहिन्यांवर चर्चा झाली. साेशल मीडियावर अनेकांनी ज्ञान पाजळले. मात्र, अशा प्रकारची काेणतीही चर्चा नव्याने झालीच नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत केला.