Chagan Bhujbal : मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्यांना वेगळे आरक्षण द्या; छगन भुजबळ यांची मागणी
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको, अशी मागणी केली आहे. तसेच आज पुन्हा एकदा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचे म्हटले आहे.