Rupali Chakankar : शहापूर शाळेतील प्रकारानंतर रूपाली चाकणकर यांची भेट; दोषींवर कडक कारवाईचे आदेश
शहापूर येथील शाळेत घडलेल्या अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह प्रकाराची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संबंधित शाळेला भेट देत पालकांशी संवाद साधला. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, मुलींच्या मानसिकतेचा विचार करून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, तसेच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शाळा पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.