• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Eknath Shinde : अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा; निधी कुठे वितरीत होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

    अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. यात निधी वाटपावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह राहुल गांधींना प्रत्युत्तर; किती काळ हवेत बाण सोडणार?

    राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी यांच्या अपमानास्पद पराभवाचे दुःख वाढले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते अजून किती काळ हवेत बाण सोडत राहणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

    Read more

    अजून किती काळ तुम्ही हवेत बाण सोडत राहणार? ; फडणवीसांचा राहुल गांधींना नेमका सवाल!

    राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या काही विजयी आमदारांच्या मतदारसंघाचे दाखले देत मोठा डाव टाकला

    Read more

    जयंत पाटील म्हणतात, डाव्यांच्या चुकीमुळे भाजपचा विस्तार; पण नेमकी कुणी मोडली डाव्यांची कंबर??, आहे का हिंमत विचार करायची खोलवर??

    नाशिक मध्ये भरलेल्या डाव्या पक्षांच्या संमेलनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी डाव्या पक्षांच्या एका चुकीमुळे भाजपचा विस्तार झाला, असा “जावईशोध” लावला.

    Read more

    त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक संपन्न झा

    Read more

    CM Fadnavis : त्रिभाषा सूत्रासंदर्भात वर्षावर आढावा बैठक; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय

    त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक आज रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    Read more

    माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत काकांनी साधला डाव, मुलगी ठेवून safe अजितदादांच्याच पुतण्याला धोबीपछाड!!

    माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत काकांनी साधला डाव, मुलगी ठेवून safe अजितदादांच्याच पुतण्याला धोबीपछाड!! असे राजकारण शरद पवारांनी खेळले.

    Read more

    Municipal Corporation Elections : मनपा निवडणुकांसाठी प्रभागरचना वेळापत्रक जाहीर; चार महिन्यांचा कालावधी, हे आहेत महत्त्वाचे टप्पे

    राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे अखेर गती मिळू लागली आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ऑक्टोबर 2025 मध्ये ही रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतरच महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

    Read more

    Prakash Ambedkar : 76 लाख वाढलेल्या मतांवर सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात मांडली बाजू, 25 जूनला निकाल

    मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर या प्रकरणात आज सुनावणी झाली. यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

    Read more

    Maharashtra Government :राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजकीय-सामाजिक चळवळींशी संबंधित फौजदारी खटले मागे घेणार, शासनादेश जारी

    महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनांशी संबंधित प्रलंबित गुन्ह्यातील आरोपपत्र दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाने यासंदर्भातील शासकीय निर्णय (जीआर) 20 जून रोजी जारी केला आहे.

    Read more

    Sangli Father : ‘NEET’मध्ये कमी गुण, संतप्त वडिलांनी लाकडी खुंट्याने मारहाण करत घेतला मुलीचा जीव, सांगलीची भयंकर घटना

    नीट’ परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने शिक्षक असलेल्या बापाने पोटच्या मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सांगलीच्या आटपाडी गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून मुलीच्या आईने फिर्याद दिली होती.

    Read more

    हिंदी सक्ती वरून आतापर्यंत फक्त एकाच कवीची पुरस्कार वापसी, पण मराठी माध्यमांनी दिली सगळे साहित्यिक एकवटल्याची बातमी!!

    पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मागे घेतला. त्याऐवजी सुधारित आदेश काढला तरी देखील महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषेची सक्ती विद्यार्थ्यांवर लादल्याचा आरोप करून मराठी कवी हेमंत दिवटे यांनी पुरस्कार वापसीची घोषणा केली.

    Read more

    बेरजेच्या राजकारणाचा मुलामा देत यशवंतरावांना विरोधी पक्ष फोडावे लागले, पण आता सगळे विरोधक स्वतःहून सत्तेच्या वळचणीला धावू लागले!!

    एकेकाळी बेरजेच्या राजकारणाचा वैचारिक मुलामा देऊन यशवंतराव चव्हाण यांना विरोधी पक्षांना फोडावे लागले होते, पण आता 2025 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने एवढे मोठे वळण घेतले आहे

    Read more

    सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासाचे महत्त्वपूर्ण नियोजन; नाशिककडे येणाऱ्या “या” रस्त्यांच्या सक्षमीकरणावर भर!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे ‘त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे 2027 मध्ये होणाऱ्या ‘सिंहस्थ कुंभमेळा’च्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक संपन्न झाली.

    Read more

    Ashish Shelar : ठाकरेंच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; उबाठा सेनेची अवस्था जीर्ण, मंत्री शेलार यांचे टीकास्त्र

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात भाजप जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार प्रविण दरेकर आणि मुंबई भाजपचे उपाध्यक्ष कमलाकर दळवी देखील उपस्थित होते.

    Read more

    Eknath Khadse : पूर्वीची भाजप भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त होती; सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरलाही घेतले, खडसेंची टीका

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली. सुधाकर बडगुजर यांचा 1993 च्या मुंबई ब्लास्टमधील आरोपी सलीम कुत्तासोबतचे फोटो भाजप नेते नितेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वी समोर आणले होते तसेच तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची देखील घोषणा केली होती. परंतु तेच आता भाजपमध्ये गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.

    Read more

    Manikrao Kokate : कृषिमंत्री कोकाटे म्हणाले- शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत; कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Manikrao Kokate  राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच हवे, असे ते म्हणालेत. […]

    Read more

    Abu Azmi : अबू आझमींचे वारीसंदर्भात वादग्रस्त विधान; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली कानउघाडणी

    समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. वारीमुळे रस्ते जाम होतात, पण मुस्लीम समाज कधीच तक्रार करत नाही. मात्र जर मुसलमानांनी नमाज पठण केले, तर तक्रार होते, असे विधान अबू आझमी यांनी केले. या याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आझमी यांच्यावर सडकून टीका केली. अबू प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये करतात, मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.

    Read more

    Supriya Sule : सुप्रिया सुळे म्हणाल्या- हुंडा घेतला तर लग्नाला जाऊ नका; महाराष्ट्र हुंडामुक्त होण्यासाठी प्रयत्न गरजेचे

    मुलगी आत्महत्या करते आणि आपण अजूनही हुंड्याविषयी बोलतोय, हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हुंडा प्रथेवर ताशेरे ओढले. तर महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी समाजाच्या सर्व स्तरावर प्रयत्न होणं आवश्यक आहे. पुण्यात एका सुशिक्षित कुटुंबातील मुलीने केवळ हुंड्याच्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

    Read more

    Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट : सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते; शिवसेना हायजॅक करण्याची आयडियाही त्यांचीच!

    राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता, असा खळबळजनक दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी देखील संजय राऊतांबद्दल असाच काहीसा दावा केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    Read more

    नागपूरकरांची स्वप्नपूर्ती; आर्थिक दुर्बल‌ घटकांना 480 घरे वाटप; महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 480 (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) ‘स्वप्न निकेतन’ सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकासकामांचे लोकार्पण केले.

    Read more

    काका – पुतण्याच्या महत्त्वाकांक्षांचे फुगेच मोठे; पण राजकीय कर्तृत्वात काटेच काटे!!

    माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून स्वतःचाच चेअरमन पदाची बेगमी करून ठेवली पण त्याचवेळी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चेची फुसकुली पुन्हा हवेत सोडली गेली.

    Read more

    बारामतीतून कर्जत जामखेड मध्ये “घुसलेल्या” रोहित पवारांची घसरण सुरूच, कर्जत दूध संघाची निवडणूक बिनविरोध राम शिंदेंचा रोहित पवारांना धोबीपछाड!!

    स्वतःचा बारामती मतदारसंघ सोडून कर्जत जामखेड सारख्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मतदारसंघात राजकीय “घुसखोरी” करून आमदारकी मिळवलेल्या शरद पवारांच्या नातवाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पाचव्यांदा धोबीपछाड दिला.

    Read more

    Sanjay Raut : ‘’ट्रम्प भारताच्या बाजूने का उभे राहिले नाहीत?’’

    अमेरिकेने आता इराण आणि इस्रायलमधील युद्धात उडी मारली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी विचारले आहे की जेव्हा इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यात सहभागी होण्याची काय गरज आहे?

    Read more