• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    ऐक्याची वातावरण निर्मिती चांगली, पण ठाकरे बंधूंच्या पुढे पहिले आव्हान शिवसेना + मनसेतली गळती रोखायचे!!

    मराठीचा मुद्दा उचलून ठाकरे बंधू एकत्र येण्याची वातावरण निर्मिती तर चांगली झाली. ठाकरे बंधू या मेळाव्यात युतीची घोषणा करणार की नाही याविषयी देखील चर्चा झाली. पण काही झाले तरी युती होणे किंवा न होणे हा भविष्यातला थोडा दीर्घकालीन भाग झाला. त्याआधी ठाकरे बंधूंच्या पुढे पहिले आव्हान आहे, ते शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमधली गळती रोखायचे!!

    Read more

    Parinay Phuke : बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून काढतायत मोर्चा; परिणय फुके यांची राज-उद्धव मेळाव्यावर टीका

    त्रिभाषा धोरणाचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर, ठाकरे गट आणि मनसेने उद्या (5 जुलै) रोजी वरळी डोम येथे संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, या मेळाव्यावर भाजपकडून जोरदार टीका होत असून, भाजप आमदार परिणय फुके यांनी खास कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची वाचाळवीर, कंत्राटदार आमदारांना ताकीद; विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देऊ नका!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाच्या निमित्ताने महायुतीमधील वाचाळवीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे चांगलेच कान धरले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या मागे लागू नका, असा सल्ला देखील दिला. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आणि अशा काळात विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद देखील फडणवीस यांनी दिली आहे.

    Read more

    Ajit Pawar : महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकली पाहिजे; उद्योजकाच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    पुण्यात एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना अशा प्रकारच्या नाऱ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Raj Thackeray : मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा; व्यावसायिक सुशील केडियांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान

    गत काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंसारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना या प्रकरणी योग्य ते उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ आले मुख्यमंत्री; शरद पवारांच्या ‘जय कर्नाटक’ घोषणेची करून दिली आठवण

    पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवर राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली.

    Read more

    Eknath Shinde : ‘जय गुजरात’वर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण; उद्धव ठाकरेंनेही तसेच म्हटल्याचा व्हिडिओ दाखवला

    अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया देखील येत असून जोरदार टीका केली जात असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

    Read more

    संघ + सेवा सहयोग उपक्रमाची 10 वर्षे : निर्मल वारी उपक्रमामुळे वारी मार्गातील गावांमधील अस्वच्छता घटली तब्बल 80 % !!

    निर्मल वारीसाठी तब्बल ३ हजार ६०० फिरते शौचालये वापरण्यात येत असून, आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात अतिरिक्त दोन हजार शौचालये बसविण्यात आली आहेत.

    Read more

    Ranvir Shorey : अमराठी दुकानदाराला मारहाण, राक्षस मोकाट फिरत आहेत म्हणत रणवीर शौरीचा मनसेवर संताप

    मीरा रोड परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये मराठी न बोलल्याच्या कारणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अमराठी दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून बॉलिवूड अभिनेते रणवीर शौरी यांनी राक्षस मोकाट फिरत आहेत म्हणत मनसेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केला आहे.

    Read more

    ठाकरे बंधूंच्या ऐक्याला महायुतीच्या नेत्यांचा भरपूर मुद्द्यांचा इंधन पुरवठा; महाविकास आघाडीचा होणार साफ सुपडा!!

    ठाकरे बंधूंच्या ऐक्याला महायुतीच्या नेत्यांचा भरपूर मुद्द्यांचा इंधनपुरवठा महाविकास आघाडीचा होणार साफ सुपडा!!, अशीच खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झालीय.

    Read more

    Amit Shah : श्रीमंत बाजीराव पेशवे स्वतःसाठी नाही तर देशासाठी लढले, अमित शहा यांचे गौरवोद्गार

    श्रीमंत बाजीराव पेशवे एक अजिंक्य योद्धा होते. आपल्या जीवनकाळात त्यांनी 41 युद्धे केली आणि एकाही युद्धात पराभव झाला नाही. ते स्वत:साठी नाही तर देश आणि स्वराज्यासाठी लढत होते, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.

    Read more

    Devendra Fadnavis : इतिहासकारांचा आपल्या नायकांवर, मराठा साम्राज्याच्या इतिहासावर अन्याय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    ब्रिटीश व काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील अनेक नायकांवर अन्याय . इंग्रजांनी व काही अंशी स्वकियांनीही आपल्या इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा व मराठी साम्राज्याचा इतिहासच इतिहासातून डिलीट करून टाकला, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    Read more

    ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्याच्या दिवशी पवारांचे वेगळेच नियोजित कार्यक्रम, मेळाव्याला राहणार गैरहजर!!

    ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्याच्या दिवशी शरद पवारांचे वेगळेच नियोजित कार्यक्रम, त्यामुळे मेळाव्याला फाऊल करण्यासाठी राहणार गैरहजर!!

    Read more

    पेशवे 100 वर्ष लढले त्यामुळे भारताचे मूळ स्वरूप टिकून राहिले; श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल अमित शाहांचे गौरव उद्गार

    थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण माझ्या जीवनात जेव्हा केव्हा नैराश्याची दस्तक येते, तेव्हा मला नेहमी बाल शिवाजी आणि श्रीमंत बाजीरावांचा विचार येतो आणि निराशा कोसो दूर जाते.

    Read more

    Devendra Fadnavis महाराष्ट्रात अंमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा; 2000 पेक्षा अधिक पान टपऱ्यांवर आणि केमिकल फॅक्टऱ्यांमध्ये कारवाई; मुख्यमंत्र्यांची माहिती

    राज्यात अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जात असून या लढ्याला अधिक आक्रमक आणि सर्वसमावेशक रूप देण्यात आले आहे.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : राज्यात २४ तास वाळू वाहतूक सुरू; नव्या धोरणाची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानसभेत घोषणा

    राज्यात वाळू वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठा बदल करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली आहे. आता वाळू वाहतूक २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी महाखनिज पोर्टलवरून २४ तास ईटीपी (इ-ट्रान्झिट पास) काढता येईल, अशी सोय सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाके समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वादग्रस्त विधाने करतात; महाराष्ट्रात फिरूही देणार नाही; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा इशारा

    दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करत असून, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस त्यांची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिला आहे. तसेच लक्ष्मण हाके यांची हालत भटक्या कुत्र्यासारखी करू, असेही त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. लक्ष्मण हाके यांच्यावर प्रतिक्रिया देताना सुरज चव्हाण यांची जीभ घसरल्याचे चित्र दिसून आले.

    Read more

    Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात ‘पिक्चर अभी बाकी’; ​​​​​​​नीतेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा; 16 तारखेच्या सुनावणीची वाट पाहा

    भाजप नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी गुरूवारी दिशा सालियन प्रकरणात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना सूचक इशारा दिला. दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे व डिनो मोरिया याच्यासह अनेकांची नावे घेतली आहेत. या प्रकरणी येत्या 16 तारखेला सुनावणी होणार असून, तोपर्यंत थांबा, असे ते म्हणालेत.

    Read more

    नारायण राणेंचा हल्लाबोल- ठाकरे बंधूंची स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड; त्यांनी एकमेकांना मिठ्या माराव्यात

    भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर टीका केली. राज व उद्धव ठाकरे हे दोघे बंधू स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत.

    Read more

    Sonu Sood : हम बैल भेजते है… लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदने दिली मदतीची ग्वाही

    गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक करून विडिओ व्हयरल झाला होता. एका ७० वर्षीय शेतकऱ्याचा हा विडिओ होता.बैलाच्या जागी स्वतःला औताला जुंपणाऱ्या लातूरच्या या वृद्ध शेतकऱ्याला मदतीचा हात देऊ केला आहे. अभिनेता सोनू सूद याने शेतकऱ्याशी संपर्क साधत त्यांना बैलजोडी देण्याची ग्वाही दिली आहे

    Read more

    2289 महिला सरकारी कर्मचाऱ्यांचा लाडक्या बहिणींच्या निधीवर डल्ला, पात्र नसताना उपटला फायदा!!

    महाराष्ट्रात 2289 महिला सरकारी कर्मचाऱ्यांचा लाडक्या बहिणींच्या निधीवर डल्ला, पात्र नसताना उपटला फायदा!!, हे सत्य आज उघड झाले. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर दिले.

    Read more

    भाजपात प्रवेशाची भाऊगर्दी, आपापसांतच करणार धुमश्चक्री; विरोधकांचा गोट रिकामा करायची खेळी!!

    नाशकात भाजप प्रवेशाची भाऊगर्दी, आपापसांतच करणार धुमश्चक्री; विरोधकांची उद्ध्वस्त वस्ती!!, अशी नाशिकच्या राजकारणाची अवस्था झालीय.

    Read more

    Maharashtra Govt : त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR; फेरविचारासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती

    त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ‘पुनर्विचारासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पूर्वीचे 2 जीआर औपचारिकपणे रद्द करण्यात आले आहेत. नव्या जीआरमध्ये उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे माशेलकरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास ही समिती करणार आहे. तसेच नवी समिती 3 महिन्यांत आपल्या शिफारसी सादर करेल.

    Read more

    MLA Apurva Hire : भाजपचा पवार काका-पुतण्यांना धक्का; माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरेंसह इंदापूरचे प्रवीण माने यांचा भाजपमध्ये प्रवेश

    राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उलथापालथी सुरू असून, अनेक बडे नेते आता पक्षांतराच्या मार्गाने आपली पुढची वाट धरत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि इंदापूर येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राजू शेट्टीचे सहकाऱ्याने कमळ हाती घेतले. नाशिकचे माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे, इंदापूरचे प्रवीण माने आणि राजू शेट्टी यांचे जवळचे सहकारी आणि शेतकरी नेते सावकार मादनाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    Read more

    Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधिमंडळात गदारोळ; राजकारणाच्या मुद्यावरून अजित पवारांनी सुनावले

    राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. इतकेच नाही तर विरोधक शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

    Read more