पवारांची “डबल गेम”; एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवरच जबाबदारी ढकलली!!
एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवर जबाबदारी ढकलली, अशी पुन्हा एकदा पवारांनी “डबल गेम” खेळली.
एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवर जबाबदारी ढकलली, अशी पुन्हा एकदा पवारांनी “डबल गेम” खेळली.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मते, AAIB ने सांगितले आहे की, अपघातादरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स (दोन फ्लाइट रेकॉर्डर) अपघातानंतर तीव्र उष्णतेत राहिला, आग लागल्याने तो खराब झाला.
चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेच्या घडामोडींवरून काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा उल्लेख करत, चंद्रपूरचा बदला आम्ही परभणीत घेतला नाही, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट राजकीय इशारा म्हणून पाहिले जात आहे. महापौर निवडणुकीतील निकालानंतर दोन्ही पक्षांतील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना चेन्नीथलांच्या या सूचक भाष्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत मोठी घोषणा केली. आगामी २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, असे पटेल यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत खाली कोसळल्याची माहिती समोर आली होती. विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने भीषण रूप घेतले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांतील राजकीय तणाव कमालीचा वाढला असून, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित दादांचे विमान मुद्दाम पाडले, असा खळबळजनक आरोप करत थेट व्हीएसआर कंपनीवर संशय व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी अजित पवारांचे एआय व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांचे कौतुक करत काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला असतानाच, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या आवाजातील एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांना थेट इशारा देत अप्रत्यक्षपणे रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्यांचे पुत्र जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स इतक्या सहजासहजी नष्ट होऊ शकत नाहीत, असे तांत्रिक मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी या चर्चांना उत्तर दिले आहे. तसेच, या घटनेचे गांभीर्य ओळखून व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा केवळ भूमिपूजन समारंभ नसून भारत, मुंबई आणि महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर रोहित पवार ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत आहेत किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदा घ्यायला लावले जात आहे, ते पाहता रोहित पवारांचा “राहुल गांधी” आणि “संजय राऊत” करून सुप्रिया सुळे नामानिराळ्या झाल्यात आणि शरद पवार सुद्धा “सुरक्षित” राहिलेत, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांच्या मनानुसार आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे लक्षात येताच रोहित पवारांनी आपले सगळे लक्ष अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर केंद्रित केले.
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवारांनी आज पुढच्या टप्प्यात जाऊन तेलगू देशम पार्टी आणि भाजपला सुद्धा संशयाच्या जाळ्यात ओढले. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तिसऱ्यांदा प्रेझेंटेशन केले आणि आरोप आणि दाव्यांच्या फैरी झाडल्या.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी दावा केला की 2014 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की मी शपथविधीची तारीख ठरवावी. त्यावेळी काँग्रेसचे 58 आमदार माझ्या पाठीशी होते.
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिमांना ५ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता. सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीसह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी हे आरक्षण होते. महायुती सरकारने २०१४चा तो निर्णय रद्द केला आहे. याविषयीचा शासन आदेश १७ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
राज्य मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणाशी माझा संबंध नसून माझी बदनामी करून कुणाला तरी मंत्रिपद हवे आहे,’ असा आरोप अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केला. २००४ पासूनच्या राजकीय कारकिर्दीत चारित्र्यावर कुणीही बोट ठेवू शकले नाही, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी अजित पवारांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी केली. त्यावर बुधवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याविषयीचा पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच टिपू सुलतानचे शौर्य होते, अशी थेट तुलना करणाऱ्या वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ७२ तासांनंतर माफी मागितली आहे. काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागात भ्रष्टाचाराचा खेळ सुरू होता. २८ ते ३० जानेवारी या शासकीय दुखवटा काळात या विभागाने ‘ओव्हरटाइम’ करून पोदार आणि सेंट झेव्हियर्ससारख्या ७५ बड्या शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे बहाल केली. यामागे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची शंका मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थित केली.
महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांची शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने एका नागरी सेवा मंडळाची स्थापना केली आहे. ‘नागरी सेवा मंडळाची’ स्थापना करण्याचा घेतलेला निर्णयामागे कायदेशीर अपरिहार्यता आणि प्रशासकीय स्थैर्य हे दोन मुख्य उद्देश आहेत. या निर्णयामुळे आता बदल्यांची प्रक्रिया केवळ राजकीय इच्छेवर अवलंबून न राहता, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार पारदर्शक पद्धतीने पार पडेल.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांनी पुण्यातील मुंढवा येथील १८०० कोटी रुपयांची जमीन ३०० कोटी रुपयांत खरेदी केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यावर मोठा गदारोळ झाला. त्यामुळे त्या वेळी अजित पवारांनी जमीन व्यवहार रद्दची घोषणा केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. जमीन व्यवहाराच्या कागदपत्रांवर पार्थ यांची सही नाही, या मुद्द्याचा आधार बनवून पार्थ यांना खारगे समितीने क्लीन चिट दिली, तसा अहवाल सरकारकडे सादर झाला, असे म्हटले जात आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टाकलेला डाव आणि विलीनीकरणाची खेळी याचा दबाव याचा उलटाच परिणाम झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपशी जरा जास्तच जवळीक वाढली. याचा प्रत्यय आजच्या राजकीय घडामोडीतून आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘मुंबई क्लायमेट वीक’चे उदघाटन संपन्न झाले.
अजितदादांच्या अपघाताविषयी संभ्रम आणि संशयाच्या जाळ्यात; रोहित पवार आणि सुप्रिया सुळे राजकीय तोट्यात!!, हेच राजकीय चित्र आता कायमचे टिकून राहण्याची शक्यता आहे.
अंजली दमानियांचा आरोप; खारगे समितीचा अहवाल निव्वळ धुळफेक; विजय कुंभारांचा आरोप
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांवर टिप्पणी केली आहे. अय्यर यांनी ANI शी बोलताना सांगितले की, INDIA ब्लॉक मजबूत करण्यासाठी एम.के. स्टालिन हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत, तर राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांचा अपघात होता की घातपात यावरून अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्सचे सत्य समोर येईलच, पण त्याचवेळी दादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या समोर आणा, अशी मागणी मिटकरींनी केली आहे.