Chandrashekhar Bawankule : अवैध धंदे करणारे लोक, गुन्हेगारांना पक्षात घेऊ नका; चंद्रशेखर बावनकुळेंच्या पक्षप्रवेशावेळी सूचना
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच अवैध धंदे करणारे लोक पक्षात घेऊ नका, असे लोक आपल्या पक्षात नकोत, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. संघटनेत जास्त काम करेल त्याला आपण संधी देऊ, असेही बावनकुळे म्हणाले. ते आज नागपुरात पक्ष प्रवेशावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदींच्या आरएसएस मुख्यालयाच्या भेटीवरून केलेल्या वक्तव्यावरही प्रत्युत्तर दिले.