वसाहतवादी मानसिकता दूर करून स्व-आधारित राष्ट्रनिर्माण ही आपली “सिव्हिलायझेशनल ड्युटी”; जे. नंदकुमार यांचे प्रतिपादन
“आत्मविस्मृत राष्ट्र विनाशाकडे वाटचाल करते. आजही वसाहतवादी मानसिकतेमुळे भारताच्या स्व-आधारित व्यवस्थांवर आघात केला जात आहे.
“आत्मविस्मृत राष्ट्र विनाशाकडे वाटचाल करते. आजही वसाहतवादी मानसिकतेमुळे भारताच्या स्व-आधारित व्यवस्थांवर आघात केला जात आहे.
आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले तर महायुतीची सत्ता जाईल आणि तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही, असा इशारा धनंजय यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनाच या महाराष्ट्रात न्याय मिळणार नसेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत करुणा यांनी यावेळी आपण दादांना न्याय मिळवून देण्यासाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याचेही जोर देऊन सांगितले. सत्ताधारी शिवसेनेचे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. यामुळे पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या चौकशीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या योजनेवरून राज्य सरकारला तीव्र शब्दांत सुनावले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन व इतर लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यास ही योजना बंद करण्याचा विचार करा, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या टिप्पणीमुळे राज्याच्या आर्थिक धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच यासाठी एक पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
दृष्टिहीन असतानाही अथांग सागरातील कठीण आव्हानांना धैर्याने सामोरे जात नागपूरची जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने तब्बल 38 किलोमीटरची पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या 11 तास 15 मिनिटांत पोहून पार केली. तिने आपल्या कौशल्याच्या जोरावर विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. अखेर अनेक घटना-घडामोडींच्यानंतर काँग्रेसने अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या घडामोडीमुळे बारामतीतील निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने सहाव्या वर्गात तिसरी भाषा लागू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने 9 एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सर्व शाळांना 7 दिवसांच्या आत याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याला तातडीचे आणि अनिवार्य (urgent & mandatory) असल्याचे सांगत लगेच अभ्यास सुरू करण्यास सांगितले आहे.
नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, एरंडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या आयटी जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे.
बारामतीत बिनविरोध साठी पवार कुटुंबियांचा आटापिटा; पण राहुरीत लढायची पवार गटाची दुटप्पी भूमिका!!, हेच राजकीय वास्तव आज पोटनिवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समोर आली.
भोंदू बाबा अशोक खरातच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर चबर चबर बोलणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद वर गप्प बसल्याची वास्तुस्थिती आज समोर आली.
याला म्हणतात काँग्रेस!!, नुसती लढाईची चुणूक दाखवून पवारांना आणले गुडघ्यावर!!, तेव्हा कुठे माघार घेतली पवारांनी फोन केल्यावर!!, हेच राजकीय वास्तव बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आजच्या म्हणजे ९ एप्रिल २०२६ या दिवशी समोर आले.
जादू-टोणा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे एकामागून एक काळे कारनामे समोर येत आहेत. ‘एसआयटी’च्या तपासात आता खरातचा एक अत्यंत धक्कादायक ‘कांड’ उघड झाला असून, तो आपल्याच श्रीमंत भक्तांना लुटण्यासाठी चक्क ‘बोगस प्राप्तिकर (Income Tax) अधिकारी’ पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, त्याच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड आणि भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!, ही राजकीय घडामोडी आज घडली.
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्याविरोधातील कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यासोबतच आरोपीला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली नाही. भाजप या प्रकरणी मुद्दा अफवा पसवून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. व्हायरल व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? आपला समाज कोणत्या दिशेला चाललाय? असा परखड सवाल त्यांनी या प्रकरणी केला आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीचा लाभ मिळेल, असा महायुतीचा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला असून, या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 55 उमेदवारांनी उडी घेतल्याने लढतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही पोटनिवडणूक आता अत्यंत चुरशीच्या आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.
नाशिक शहरातील एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत इस्लामी जिहाद चालू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि नोकरीची गरज असलेल्या तरुण महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर केवळ लैंगिक अत्याचारच करण्यात आले नाहीत, तर त्यांच्या धार्मिक भावनांशीही क्रूर खेळ खेळला गेला. त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने आता कठोर पावले उचलून सहा आरोपींना अटक केली.
काँग्रेसचे काही नेते बारामती विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राहुल गांधी यांना उतरवण्याची तयारी करत आहेत. जर काँग्रेस बारामती विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधींना बोलणार
नाशिक मध्ये भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी ११ महिलांनी पुढे येत खरातविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे एकूण तक्रारींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील वादग्रस्त पुतळा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. पुतळा पुरवणारा मुख्य सूत्रधार बाळराजे ऊर्फ बाळू आवारे याच्या जालन्यातील कारखान्यावर प्रशासनाने टाळे ठोकले असून, त्याच्या एका जवळच्या साथीदारालाही सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत पुतळे तयार करणाऱ्या आणि बसवणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. महेश सावंत यांच्या वतीने ॲड. अमित कारंडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, जी न्यायालयाने ग्राह्य धरली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचे परखड शब्दांत समर्थन केले आहे. पार्थदादा पवार यांचे विधान काँग्रेसला फारच झोंबले आहे. यामुळेच काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू सुरू असल्याच्या त्यांच्या विधानानंतर एरवी डबक्यात लपून बसलेली बेडके बाहेर पडून एकदम डऱ्याव डऱ्यावर करत आहेत, असे ते म्हणालेत.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.