Devendra Fadnavis : आपल्यातील राम जाणल्यास असुरी शक्तींचा विनाश शक्य – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे आयोजित श्रीराम अध्यात्म मंदिर, रामनगर येथे ‘पश्चिम नागपूर शोभायात्रा’ मध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित रामभक्तांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्याशी संवाद साधला.