Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर एक धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुंबई वाहतूक पोलिसांना एका पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला आहे. धमकी मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत आणि तपास सुरू करण्यात आला आहे.