Ajit Pawar : अजित पवारांची रोहित पवारांवर टीका- कोणीही उपटसूंभ उठतो, मी उत्तर द्यायलाच बांधील नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, त्याला उत्तर द्यायलाच मी बांधील आहे, अे नाही. यासोबतच माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांचा मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून घेऊ. अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात अजित पवार यांनी उपस्थित राहून माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.