म्हणे, दोन तारखेनंतर “राजकीय भूकंप”, पवारांच्या नादी लागून एकनाथ शिंदे स्वतःचा “उद्धव ठाकरे” करून घेतील का??
महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका अशा टप्प्याच्या वळणावर आल्या आहेत, की जिथून 2 डिसेंबर या तारखे नंतर राज्यात “राजकीय भूकंप” होण्याचे पतंग उडू लागले आहेत. ज्या “पवार बुद्धीच्या” माध्यमांना महाराष्ट्रातले फडणवीस सरकार अमान्य आहे, त्यांनीच या पतंगांना मोठी हवा देऊन ते उंच उंच हवेत उडवले आहेत.