Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप जोरकसपणे फेटाळले आहेत. अंजली दमानिया यांचे आरोप निव्वळ हास्यास्पद, मीडिया ट्रायल करणे व अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन आहे, असे ते म्हणालेत.