Prakash Ambedkar : ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले- योगेश कदमांची हकालपट्टी करा, असंवेदनशील गृहराज्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी बाजूला करावा!
महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही लकवा मारल्यासारखी झाली आहे. पुण्यातील घटनेवर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य असंवेदनशील आहे. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदमसारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असे म्हणत त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.