Nitin Gadkari : दिल्लीत हवाई बस, नागपूरमध्ये फ्लॅश चार्जिंग इलेक्ट्रिक बस तर डोंगराळ भागांसाठी डबल-डेकर बस
देशात उडणाऱ्या बसेसचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या अगदी जवळ आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, भारत सरकार सार्वजनिक वाहतुकीचे पूर्णपणे रूपांतर करण्यासाठी अनेक क्रांतिकारी प्रकल्पांवर काम करत आहे. यामध्ये हवाई बसेस, फ्लॅश चार्जिंग इलेक्ट्रिक बसेस आणि डोंगराळ राज्यांसाठी डबल-डेकर फ्लाइंग बसेस यांचा समावेश आहे.