महादेव मुंडे खून प्रकरणी 25 तारखेपर्यंत एसआयटी करा, राज्यभरात आंदोलन करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा
महादेव मुंडे खून प्रकरणात चौकशीसाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. मुंडे यांचा खून होऊन दीड वर्ष उलटले तरी देखील तपास लागला नाही.
महादेव मुंडे खून प्रकरणात चौकशीसाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. मुंडे यांचा खून होऊन दीड वर्ष उलटले तरी देखील तपास लागला नाही.
उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला कंटाळून लवकरच अनेक आमदार पक्षाला निरोप देतील. ठाकरे गटाचे ७० ते ७५ टक्के खासदार आणि आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा शिवसेनेचे ,( शिंदे गट,)उपनेते संजय निरुपम यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ भूषणावह नाही, अशी परखड टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था येऊन ठेपली आहे.
२००६ मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या सात साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि धक्कादायक निकाल दिला आहे. या स्फोटांमध्ये १८९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८२४ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस.जी. चांडक यांच्या विशेष खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या प्रकरणातील एकूण १२ आरोपींपैकी ११ आरोपी निर्दोष ठरवण्यात आले असून, एक आरोपी खटल्यादरम्यानच मरण पावला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पत्ते उधळून आंदोलन केले. त्यानंतर छावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी जोरदार हाणामारी झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंसाचार मारहाण वगैरे प्रकारांचा सोशल मीडियातून निषेध करून छावा संघटनेला “शांत” करायचा प्रयत्न केला
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंसाचार मारहाण वगैरे प्रकारांचा सोशल मीडियातून निषेध करून छावा संघटनेला “शांत” करायचा प्रयत्न केला, पण मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण वर कारवाई करणार की नाही, याविषयी मौन बाळगले.
महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. जवळपास 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे पाटील यांना मारहाण केली.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेल्या आणि भाजपने सत्तेबाहेर ठेवलेल्या पवार संस्कारितांची थांबेना दादागिरी; फडणवीस, लवकर साधा सफाईची संधी!!, असे म्हणायची वेळ दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दादागिरीमुळे आली.
शासनाच्या विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेल्या १३,६४५.३३ कोटींच्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागीय कार्यालयांनी आजपर्यंत सादर केलेली नाहीत. मुंबई वित्तीय नियम १९५९ नुसार कोणत्याही अनुदानाचा उपयोग झाल्यानंतर ते प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत महालेखापाल कार्यालयाला पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, शासन यंत्रणा याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे कॅगच्या अहवालातून दिसते.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशन काळात फडणवीस सरकारला अडचणीत आणायची संधी विरोधकांना पुरती साधता आली नाही
जगाला जर शांतता हवी असेल, तर हिंदू जीवनविचारांच्या आधारावरच पुढे जावे लागेल. याचे प्रारूप येत्या २५ वर्षांत संघ विकसित करेल, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण संयोजक शरदराव ढोले यांनी दिली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्यानंतर घडलेल्या सगळ्या एपिसोड मध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी केली.
भारतीय मानक ब्युरो (BIS) ने शुक्रवार (१८ जुलै) पासून ९ कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. आतापर्यंत, केवळ २४ कॅरेट, २३ कॅरेट, २२ कॅरेट, २० कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य होते. हॉलमार्किंग सोन्याच्या शुद्धतेची पुष्टी करते. तथापि, सोन्यापासून बनवलेल्या घड्याळे आणि पेनवर आता हॉलमार्किंग आवश्यक नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, महिलांना मागासलेल्या परंपरा आणि रूढींपासून मुक्त करणे खूप महत्वाचे आहे.महाराष्ट्रातील सोलापूर येथे ‘उद्योगवर्धिनी’ संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले- महिलांचे सक्षमीकरण हा कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे.
विधिमंडळात मारामारी, पोलीस स्टेशनमध्ये दादागिरी, सभागृहात जंगली रम्मी; अशी सगळीकडेच “पवार संस्कारितांची” त्यांची हुल्लडबाजी!!, असे चित्र महाराष्ट्रात उभे राहिलेय.
राज्यात हनीट्रॅपमुळेच शिंदे सरकार सत्तेत आल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या या व्यक्तीने केलेले हे वक्तव्य अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी ता. १९ हिंगोलीत पत्रकार परिषदेत दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेद्वारे त्यांच्यावर हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेमुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधूंची राजकीय युती होईल की नाही याची नाही खात्री; पण अमित शाहांनी फडणवीसांना केलेल्या सूचनांची संजय राऊतांकडे “पक्की माहिती”!!, असला प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातून समोर आला.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी चर्चा आणि नियोजनामध्ये वेळ वाया घालवण्यात आला,” या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत होत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “लोकसभेनंतर आपणच मुख्यमंत्री होणार अशी अनेकांची अपेक्षा होती,” असे म्हणत त्यांनी पटोले यांची स्पष्ट नाव न घेता खिल्ली उडवली.
लोकसभा निवडणुकीतल्या यशाची डोक्यात हवा गेल्याची उद्धव ठाकरेंनी कबुली दिली. त्यांना विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींच्या डोक्यात जी हवा गेली, ती कोण काढणार??, असा सवाल तयार झालाय.
हनीट्रॅपच्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांना धू धू धुतले होते. सभागृहाचा वेळ वाया घालविल्याबद्दल चांगलेच खडसावले होते. आज पुन्हा काँग्रेसचे दुसरे आमदार विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तेच आरोप केले आहेत.
ठाकरे हा ब्रँड बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे होता. यांनी हिरव्या सापांना जवळ करत हा ब्रँड संपवला आणि आता बोलत आहे. यात आमची काय चुकी? त्यांची चुकी आहे. त्यांनी हिंदुत्व सोडले. उबाठामध्ये केवळ आदित्य ठाकरे,उद्धव ठाकरे राहणार आहेत, असा हल्लाबोल भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.