Sharad Pawar : राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडली; काही घटक गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नांत; शरद पवारांची बीड प्रकरणावर भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बीडमधील कथित गुन्हेगारीवर थेट भाष्य केले. राज्यातील सरसकट वातावरण बिघडल्याचे मी म्हणणार नाही. पण काही ठिकाणी निश्चितच परिस्थिती बिघडली आहे. काही घटक त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्याविरोधात योग्य ती कारवाई सरकारने करावी, असे ते म्हणालेत.