Amit Shah : सहकार क्षेत्राच्या विकासातून भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने – अमित शाह
भारताच्या आर्थिक विकासात सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल आणि त्याच्या माध्यमातून देश 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल, असे केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांनी सांगितले. पुण्यातील जनता सहकारी बँक लिमिटेडच्या हीरक महोत्सव समारोप सोहळ्यात ते बोलत होते.