Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञान क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई टेक इंट्राप्रिनियर असोसिएशन’द्वारे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित आशिया खंडातील सर्वात मोठ्या कुत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रदर्शन असलेल्या ‘मुंबई टेक वीक 2025’ कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी’ या विषयावर ऋषी दर्डा यांनी मुलाखत घेतली