म्हणे, मराठी माणूस पंतप्रधान!!, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याला सुद्धा का सोडावीशी वाटली पुडी??
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका सुरू असताना मध्येच मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या बाता सुरू झाल्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या धीरगंभीर नेत्याने ही पुडी महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत सोडली. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या Epistine files चा हवाला देऊन डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्याचे पडसाद भारतातून उमटून मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असा बादरायणी संबंध जोडला.