Nepal : नेपाळमध्ये राजेशाही समर्थकांकडून हिंसाचारानंतर लष्कर तैनात; काठमांडूत कर्फ्यू; सरकारला अल्टिमेटम
शुक्रवारी नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने झाली. काठमांडूतील टिनकुने येथे निदर्शकांनी एका इमारतीची तोडफोड केली आणि आग लावली. निदर्शकांनी पोलिसांवरही दगडफेक केली, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेत एका तरुणाचाही मृत्यू झाला.