Uday Samant शिवसेनेतल्या “नव्या उदयाचा” प्लॅन फसला की भाजपने “विजय” दारातच अडवला??
महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये पालकमंत्री पदाच्या वाटपाचा विषय चिघळल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा खुलासा समोर आला. महाराष्ट्रात म्हणे शिवसेनेत “नवा उदय” करायचा प्लॅन होता, पण तो फसला, पण त्याच वेळी भाजपने “विजय” दारातच अडवला अशीही बातमी उघड्यावर आली.