महाराष्ट्रात 4537 अंगीकृत रुग्णालयांमध्ये 2399 रोग आणि विकारांवर मोफत उपचार; मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन शुभारंभ
केंद्रातल्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचा विस्तार केला आहे. अनेक खर्चिक आणि दुर्मिळ आजारांवर या दोन्ही योजनांद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतात.