मोठी बातमी! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ३० जण बुडाल्याची भीती
चिंचवड भागात आज (१५ जून) संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल नदीत कोसळला, ज्यामुळे अनेकजण वाहून गेले आहेत.
चिंचवड भागात आज (१५ जून) संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल नदीत कोसळला, ज्यामुळे अनेकजण वाहून गेले आहेत.
अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यात एका डेमोक्रॅटिक नेत्याच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येवोत किंवा न येवोत, महाविकास आघाडी होवो किंवा न होवो उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचे 300 चे गणित मांडून शाखाप्रमुख यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कामाला लावले.
इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धाची परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले होत आहेत.
मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षादरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार आणि खासदार यांच्यात एकमेकांमध्ये नाही पायपोस; पण जयंत पाटील म्हणाले मुंबईत भाजपला आणखी लोकांची गरज!!, असला प्रकार समोर आला.
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या पचामा डोंगराळ परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार नक्षलवाद्यांना ठार मारले असून, त्यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ही कारवाई बिठली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भागात करण्यात आली.
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत इराणमध्ये १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री १०:३० वाजता इस्रायलने इराणच्या अणुतळांवर दुसऱ्यांदा लढाऊ विमानांनी हल्ला केला. या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाला. तर ३५० हून अधिक लोक जखमी झाले.
अहमदाबाद येथील विमान अपघातात सायबर हल्ल्याची भीती व्यक्त करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघात अहमदाबाद येथेच कसा झाला? या विमानतळाची देखरेख करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. या माध्यमातून संजय राऊत यांनी विमान अपघाताच्या प्रकरणात केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.
एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे अजून आपापल्या पक्षांच्या एकी-बेकीचीच चाचपणी करताहेत, तर दुसरीकडे भाजपने संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वयाची बैठक घेऊन राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी देखील सुरू केली आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक धक्कादायक विधान करत म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे यांनी मला बोलावले तर मी नक्की त्यांना भेटायला जाईन.” त्यांनी स्पष्ट केले की, ते राजकारण आणि वैयक्तिक नाती यामध्ये गोंधळ करत नाहीत. त्यामुळे त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
उद्धव आणि राज हे दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. मात्र दोन भाऊ व दोन्ही पक्ष हे एकत्र येणार नाही यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असा आरोप उबाठा नेते भास्कर जाधव यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. घराघरात भांडणे लावून राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार भाजप करीत आहे. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मते या दोन भावांना मिळतील, असा सर्व्हे आहे, त्यामुळे भाजप घाबरलेला आहे, असे जाधव यांनी सांगितले.
येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक धक्कादायक आरोप करत पोलिस प्रशासन आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा केवळ राजकीय दबावामुळे दाखल करण्यात आला आहे.” यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचा इशारा दिला.
“आज पैसा नाही तर माणूस हेच खरे भांडवल आहे. उद्योगधंदे तिथेच जातात जिथे प्रशिक्षित कामगार, संशोधन आणि नवकल्पना असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि बहुविध कौशल्य असलेली कार्यबल तयार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. रविवारी सकाळी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण होते. या अपघातात सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बालाघाटमध्ये पोलिसांनी चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवाद्यांना ठार केले. शनिवारी दुपारी बिथली पोलिस चौकी परिसरातील पचामा दादरच्या जंगलात ही चकमक झाली.
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. या युद्धजन्य स्थितीमुळे इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे लक्षात घेऊन भारत सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत.
भाजप आमदार आणि खासदारांच्या प्रशिक्षण शिबिराला आज मध्य प्रदेशातील पचमढी या हिल स्टेशनमध्ये सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याचे उद्घाटन केले. त्यांनी खासदार आणि आमदारांना संबोधित केले. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिराला संबोधित केल्यानंतर शहा येथून भोपाळला रवाना झाले.
इराणमधून लीक झालेल्या काही अत्यंत संवेदनशील दस्तऐवजांमुळे पुन्हा एकदा पाकिस्तान आणि त्याच्या अणु कार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय संशयाची सावली गडद झाली आहे. या दस्तऐवजांमध्ये दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानने १९८०–९०च्या दशकात इराणला गुप्तपणे अणु तंत्रज्ञान पुरवले. हे आरोप नव्याने समोर आले असले, तरी यामागील इतिहास आणि त्याचे आजच्या परिस्थितीवर होणारे संभाव्य परिणाम अत्यंत गंभीर आहेत.
बांगलादेशला लागून असलेल्या आसाममधील धुबरी जिल्ह्यात जातीय तणाव रोखण्यासाठी उपद्रवींना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिले आहेत. हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मंदिरात गोमांस फेकण्याची घटना कधीच घडायला नको होती. यामध्ये सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या धुबरी जिल्ह्यात रात्रीच्या वेळी दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश लागू केले जातील असे ते म्हणाले.
इजराइल आणि इराण यांच्या संघर्षात चीन पुरस्कृत शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेने फक्त इजरायल वर एकतर्फी हल्लाबोल केला, पण भारताने मात्र वेळीच वेगळा सूर काढून फक्त इजरायलवर होणाऱ्या टीकेतून अंग काढून घेतले.
अहमदाबाद विमान अपघाताला सुमारे ४५ तास उलटून गेले आहेत. आठपेक्षा अधिक एजन्सी तपासात गुंतल्या आहेत. हा अपघात कसा झाला? का झाला? तांत्रिक बिघाड होता की आणखी काही? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. जगभरातील तज्ज्ञ अपघाताची कारणे शोधत आहेत. अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्याची तपासणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊयात, विमानामधील नारंगी रंगाच्या उपकरणाला ब्लॅक बॉक्स का म्हणतात?.
मणिपूर पोलिस, सीएपीएफ, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी १३-१४ जूनच्या रात्री, खोऱ्यातील ५ जिल्ह्यांच्या बाहेरील भागात शोध मोहीम राबवली. यामध्ये स्फोटके आणि इतर युद्ध साहित्यांसह १५१ एसएलआर रायफल्स, ६५ इन्सास रायफल्स, ७३ इतर प्रकारच्या रायफल्स, ५ कार्बाइन गन, २ एमपी-५ गन आणि इतर युद्ध साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ३२८ बंदुका आणि रायफल्स जप्त करण्यात आल्या.
अहमदाबादेतील एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. १२ जून रोजी झालेल्या या भयानक अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये केवळ विमानातील प्रवासीच नव्हते तर विमान ज्या इमारतीला धडकले तेथील वैद्यकीय विद्यार्थ्यांसह अन्य काही जणांचाही समावेश होता.