• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 9 of 1312

    Pravin Wankhade

    Subrata Roy’ : सुब्रत रॉय यांच्या मुलाला ईडीने फरार घोषित केले, 1.74 लाख कोटींच्या घोटाळ्यात सहाराविरुद्ध आरोपपत्र

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोलकाता न्यायालयात सहारा इंडिया ग्रुपविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात १.७४ लाख कोटी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्याचा उल्लेख आहे.ईडीने सहारा संस्थापक दिवंगत सुब्रत रॉय यांच्या पत्नी सपना रॉय आणि मुलगा सुशांत रॉय यांना आरोपी म्हणून नाव दिले आहे. अनिल वलपारंपिल अब्राहम आणि जितेंद्र प्रसाद (जेपी) वर्मा यांच्यासह समूहाचे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील आरोपींमध्ये आहेत.

    Read more

    Vice Presidential election : राहुल गांधी आणि विरोधकांचा मतचोरीच्या मुद्द्यावरून बाहेर बवाल; पण विरोधकांपुढे खासदारांचे संख्याबळ टिकवण्याचे खरे आव्हान!!

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून बाहेर मोठा बवाल चालवलाय; प्रत्यक्षात विरोधकांपुढे खासदारांचे सध्याचे संख्याबळच टिकवण्याचे खरे आव्हान आहे, हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सत्य समोर आले.

    Read more

    Hockey Asia Cup : भारताने चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव

    भारताने पुरुष हॉकी आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. रविवारी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. भारताने हे विजेतेपद चौथ्यांदा जिंकले. या विजयासह भारताने २०२६ च्या विश्वचषकातही स्थान मिळवले.

    Read more

    Adani Group : अदानी ग्रुप 2032 पर्यंत 5.34 लाख कोटींची गुंतवणूक करणार, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशनवरही फोकस

    गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने पुढील सात वर्षांत (आर्थिक वर्ष २०३२ पर्यंत) वीज उत्पादन, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशन-वितरणात सुमारे ६० अब्ज डॉलर्स (सुमारे ५.३४ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या गुंतवणुकीचा उद्देश भारताची वेगाने वाढणारी वीज मागणी पूर्ण करणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यास मदत करणे आहे.

    Read more

    Modi :भाजप खासदारांच्या कार्यशाळेत सर्वात मागे बसले मोदी, म्हणाले- सहकाऱ्यांकडून शिकणे महत्त्वाचे

    भाजप खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा रविवारी सुरू झाली. पंतप्रधान मोदींनीही त्यात सहभाग घेतला. यादरम्यान ते सभागृहातील शेवटच्या रांगेत बसले. फोटो शेअर करताना पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, संसद कार्यशाळेत, देशभरातील सहकारी संसद सदस्य आणि वरिष्ठ नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि जनतेची चांगली सेवा करण्यासाठी असे व्यासपीठ खूप महत्वाचे आहे.

    Read more

    सगळ्यांचेच संख्याबळ तोकडे, म्हणूनच कुठे, काय मिळते का बघायला मातोश्रीवर भेटले!!

    सगळ्यांचेच संख्याबळ तोकडे, म्हणूनच कुठे काय मिळते का बघायला मातोश्रीवर भेटले!!, अशी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था आली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि आमदार अमिन पटेल हे आज उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. तिथे त्यांनी राज्याच्या राजकारणा संदर्भात विविध अंगांनी चर्चा केली. या चर्चेची माहिती बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. या भेटीचे फोटो सगळ्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वर शेअर केले.

    Read more

    Japan PM : पक्ष फुटू नये म्हणून जपानच्या पंतप्रधानांचा राजीनामा, बहुमत गमावल्यानंतर इशिबांना हटवण्याची मागणी तीव्र

    जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी राजीनामा दिला. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) मधील फूट टाळण्यासाठी इशिबा यांनी हे पाऊल उचलले आहे. जपानी माध्यमांनी एनएचकेने हे वृत्त दिले आहे.

    Read more

    Canada : कॅनडाची कबुली- देशात खलिस्तानी दहशतवादी संघटना सक्रिय, निधी उभारला जात आहे;

    कॅनडाच्या सरकारने कबूल केले आहे की खलिस्तानी दहशतवादी संघटना देशाच्या भूमीवर सक्रिय आहेत. त्यांना कॅनडामध्येही निधी मिळत आहे. त्यांचे उद्दिष्ट नवीन राजकीय व्यवस्था निर्माण करणे किंवा हिंसाचाराद्वारे विद्यमान व्यवस्था बदलणे आहे.

    Read more

    याला म्हणतात, खानदानी हुशारी; पण काकांची हिंदी कच्ची असल्याचे सांगून पुतण्याने त्यांची इज्जत वाढविली की घालविली??

    महाराष्ट्राच्या राजकारणातले पवार खानदान राजकीय मखलाशा करण्यात आणि कोलांट उड्या मारण्यात कसे “तयार” आहे, याचे वर्णन परस्पर वैचारिक विरोधक असलेले भाऊ तोरसेकर आणि राजू परुळेकर हे दोन ज्येष्ठ पत्रकार एकमताने करत असतात.

    Read more

    Netanyahu : नेतन्याहू म्हणाले- 1 लाख लोकांनी गाझा शहर सोडले, आकाशातून पत्रके टाकण्यात आली

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे की, १ लाख लोक गाझा शहर सोडून गेले आहेत. जेरुसलेममध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, नेतन्याहू म्हणाले की, हमास लोकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करता येईल. इस्रायली पंतप्रधानांच्या मते, हमासने महिला आणि मुलांना गोळ्या घालून रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

    Read more

    RSS : संघाचे प्रचार प्रमुख म्हणाले- लव्ह जिहाद आणि धर्मांतर सामाजिक उपद्रव, हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले- लव्ह जिहाद आणि धर्मांतर हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सौहार्दासाठी गंभीर धोका आहे. ते म्हणाले- बळजबरीने, प्रलोभनाने किंवा फसवणुकीने केलेले धर्मांतर अयोग्य आहे. यामुळे समाजात अशांतता निर्माण होऊ शकते. आमचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत हे थांबवणे आहे. या समस्येचे निराकरण ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे की लवकरच अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

    Read more

    X Claims : X चा दावा- भारत आपल्या गरजांसाठी रशियन तेल खरेदी करतो, अमेरिकाही युरेनियम खरेदी करतो, हे डबल स्टँडर्ड

    टेस्लाचे मालक एलन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या फॅक्ट चेक फीचरने ट्रम्प सल्लागार पीटर नवारो यांच्या भारताने रशियन तेल खरेदी केल्याच्या दाव्यांचे खंडन केले आहे.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवारांचा हल्लाबोल- सर्वांना मान्य असणारा जीआर काढला तर हा ओबीसींचा वाद का? छगन भुजबळ यांना माहिती नव्हती का?

    मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. तसेच ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासह पवार कुटुंबावर देखील हल्लाबोल सुरू केला आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    कर्नाटकात जातीनिहाय सर्वेक्षणाआधीच हिंदूंमध्ये फूट पाडायची आखणी; सामाजिक ऐक्याच्या टक्केवारीची वेगवेगळे तुकडे करून मांडणी!!

    बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जसा प्रशांत किशोरने गांधी आंबेडकरांच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडायचा फॉर्म्युला मुस्लिमांना दिलाय

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन- मराठा आरक्षण देताना ओबीसींना कोणताही धक्का नाही, तुम्ही मागत रहा, शक्य तेवढे देत राहू

    पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांनी मागत राहावे, आम्ही शक्य तेवढे देत राहू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

    Read more

    प्रशांत किशोरचा मुस्लिमांसाठी शेखचिल्ली फार्म्युला; गांधी + आंबेडकरांच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडा, हिंदू + मुस्लिम एकता साधा!!

    बिहार विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला पुढे आणलाय.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास- सरकारचे काम सुरू झाले, आता आरक्षण नक्की, मुंबईचे मालक आम्ही!

    मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काम सुरू केले आहे. आमचे काम सुरू केले तर सरकारला आम्ही मोठेपण देऊ. तुम्ही जर आमचे कामे केले तर आम्ही सरकारचे कौतुकच करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

    Read more

    Minister Shivendra Raje Bhosale : मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले- देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते, राजकारणासाठी त्यांनी कधी समाजाचा वापर केला नाही

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसींचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत. त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली नाही. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी आरक्षण दिले आहे, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते आहेत, राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केला नाही, त्यामुळे आरक्षणासाठी कोण बोलत असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असे भोसले यांनी म्हटले आहे. क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोहळ्यात बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

    Read more

    Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची जहरी टीका- अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता, कारखाना चालवण्याशिवाय दुसरे काय जमते?

    राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतीतल्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत आहेत. शरद पवारांनीच जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले असल्याची टीका त्यांनी शुक्रवारी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

    Read more

    Banjara Community : बंजारा समाजालाही आरक्षण द्यावे:अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, धर्मगुरू जितेंद्र महाराज यांचा इशारा

    शासनाने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटीयर लागू केले त्यानुसारच बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा बंजारा समाजाचे धर्मगुरु जितेंद्र महाराज (पोहरादेवी) यांनी रविवारी ता. ७ हिंगोली ेयेथे दिला आहे.

    Read more

    General Chauhan : डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही ताकद दाखवावी लागणार, जनरल चौहान यांचे आवाहन

    भारताच्या सुरक्षेसमोर उभे ठाकलेले धोके दिवसेंदिवस वाढत असून ते केवळ सीमारेषेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते बहुआयामी झाले आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी दिलेल्या भाषणात या धोक्यांची सविस्तर चर्चा करत सहा प्रमुख आव्हाने अधोरेखित केली. सीमारेषेवरच नव्हे तर डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही ताकद दाखवावी लागणार आहे असे आवाहन त्यांनी केले.

    Read more

    Owaisi’s : ओवैसींचा इंडिया आघाडीला पाठिंबा, काँग्रेसच्या गोटात खळबळ, ‘भाजपची बी टीम’ म्हणणाऱ्यांना आता काय उत्तर?

    उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणांमध्ये मोठी हलचल. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना दिलेला पाठिंबा काँग्रेससाठी वरदान की अडचण, यावरच आता चर्चा रंगली आहे.

    Read more

    नवभारताचा रोडमॅप : पायाभूत सुविधांमध्ये होणार क्रांती

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारने २०२९ पर्यंत देशभरात भव्य पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्याला ‘नवभारताचा रोडमॅप’ असे संबोधण्यात आले

    Read more

    Pakistan : पाकिस्तान बाॅम्बस्फाेटाने हादरले, खैबर पख्तूनख्वा प्रांतात क्रिकेट सामन्यादरम्यान भीषण स्फोट

    पाकिस्तान पुन्हा एकदा बाॅम्बस्फाेटाने हादरले असून बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट मैदानात शनिवारी संध्याकाळी सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून मुलांसह अनेक प्रेक्षक जखमी झाले आहेत.

    Read more

    ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुन्हा ग्वाही

    मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे

    Read more