Congress : काँग्रेसने म्हटले- जागावाटपावर तडजोड करणार नाही; राहुल तेजस्वी यांना भेटले नाहीत
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने सांगितले की, महाआघाडीतील जागावाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. जागावाटपाबाबत राजदसोबतचा वाद सुरूच आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने सांगितले की, महाआघाडीतील जागावाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. जागावाटपाबाबत राजदसोबतचा वाद सुरूच आहे.
मनोज जरांगे यांनी आंदोलन करून मिळवलेल्या मराठा आरक्षणाचा राजकीय डाव आता उघड्यावर आला असून आत्तापर्यंत गावचे राजकारण “सरकार”, 96 कुळी, 92 कुळी मराठे म्हणून हाताळणाऱ्या गाव पुढार्यांनी कुणबी दाखले काढून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवायची तयारी चालविल्याचे समोर आले आहे.
समोर अजितदादांचे भाषण सुरू, तरीही माणिकराव कोकाटे मोबाईल पाहण्यात मग; नवाब मलिक + धनंजय मुंडे यांना पहिल्या रांगेत स्थान!!, असे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार – खासदारांच्या बैठकीत पाहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सणवारांच्या काळात vocal for local ही घोषणा देऊन आता बरीच वर्षे झाली.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Mongolia मंगोलियाचे राष्ट्रपती खुरेलसुख उखना यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये युरेनियम पुरवठा, १.७ अब्ज डॉलर्स (१५,००० […]
राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी मंगळवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या भेटीवेळी विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध गंभीर त्रुटींवर आवाज उठवला. यावेळी राज ठाकरे यांनी विशेषतः मतदार याद्यांमधील ‘घोळ’ आणि ‘मतदार नोंदणी’ थांबवल्याच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले.
बिहारच्या सुरेल आवाजाने घराघरात पोहोचलेली लोकगायिका मैथिली ठाकूर आता राजकारणाच्या मैदानात उतरली आहे! मंगळवारी (१४ ऑक्टोबर) पाटण्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांनी औपचारिकपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. वरिष्ठ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने बिहारच्या राजकारणात नवा रंग भरला आहे.
भाजपने मंगळवारी बिहार निवडणुकीसाठी ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे: तारापूरचे सम्राट चौधरी आणि लखीसरायचे विजय सिन्हा.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इथून पुढे व इथून मागे 100 वर्षांत झाले नाही असे आंदोलन उभे करणार असल्याचे ते म्हणालेत. एवढेच नाही तर कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय नोकर भरती न करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जरांगे व सरकारमधील वाक्युद्ध एका नव्या वळणावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावरील त्यांच्या फोटोवर नाराजी व्यक्त केली आहे आणि तो त्यांनी पाहिलेला सर्वात वाईट फोटो असल्याचे म्हटले आहे.ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलबद्दल नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, टाइमने त्यांच्याबद्दल एक चांगला लेख लिहिला होता, परंतु कदाचित आतापर्यंतचा सर्वात वाईट फोटो प्रकाशित केला होता.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुमारे तास-दीड तास ही बैठक झाली. पण आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित राहिल्याने उद्या पुन्हा ही बैठक होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विराम दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे सध्या यावर चर्चा करणे ‘जर-तर’च्या प्रश्नासारखे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेनुसार, ही आघाडीची चर्चा फक्त इंडिया आघाडीच्या विद्यमान भागीदारांसोबतच पुढे जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिंदे सेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह दिला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे.
नेपाळपाठोपाठ आफ्रिकन देश मादागास्करमध्येही GenZ निदर्शनांमुळे सत्तापालट झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, विरोधी पक्षाचा दावा आहे की, राष्ट्रपती अँड्री राजोएलिना देश सोडून पळून गेले आहेत.
जागावाटपावरून महाआघाडीत फूट पडण्याची चिन्हे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने बिहारमधील सर्व २४३ जागांसाठी उमेदवारांची यादी आपल्या नेत्यांकडे मागितली आहे.
महाविकास आघाडीचे नेते गेले निवडणूक आयोगाकडे पण महायुतीचे नेते पोहोचले पक्षांच्या बैठकांमध्ये आणि नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये!!, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन समांतर घडामोडी घडल्या.
२०२०च्या दिल्ली दंगली प्रकरणातील आरोपी शरजील इमाम बिहार विधानसभा निवडणूक लढवू शकतो. त्याने दिल्लीच्या करकडडूमा न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल केला आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) त्यांच्या “विशेष मोहीम 5.0” चा भाग म्हणून स्वच्छ शौचालय चित्र आव्हान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत, ग्राहक कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझाजवळील घाणेरड्या शौचालयांची तक्रार NHAI वेबसाइटवर करू शकतात.
महाराष्ट्र बांबू उद्योग धरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंजुरी दिली. फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक निर्णय घेतले. (उद्योग विभाग)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इजिप्तच्या शर्म अल-शेख शहरात झालेल्या एका प्रमुख परिषदेत गाझा शांतता करारावर स्वाक्षरी केली आणि तो करार खूप खास असल्याचे म्हटले.
दिल्लीतील एका न्यायालयाने सोमवारी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या चैतन्यानंद सरस्वती यांना जामीन नाकारला, कारण पीडितांची संख्या जास्त असते तेव्हा गुन्ह्याचे गांभीर्य अनेक पटींनी वाढते.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले; अमेरिकेचे अध्यक्षांनी भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांचे स्वागत केले!!, एवढा मोठा फरक गेल्या 17 वर्षांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पडला.
बिहार निवडणुकीच्या फक्त चार आठवडे आधी दिल्लीच्या न्यायालयाने सोमवारी माजी रेल्वेमंत्री आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध आयआरसीटीसी हॉटेल जमीन घोटाळ्यात आरोप निश्चित केले.
या वर्षीचा नोबेल पुरस्कार तीन अर्थशास्त्रज्ञांना देण्यात आला आहे: जोएल मोकिर (यूएसए), पीटर हॉविट (यूएसए) आणि फिलिप अघियन (यूके).नोबेल समितीने म्हटले आहे की या अर्थशास्त्रज्ञांनी नवोपक्रमामुळे आर्थिक विकास कसा होतो हे दाखवून दिले आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलते आणि आपल्या सर्वांवर परिणाम करते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या फेब्रु-मार्च 2026 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आणि अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करता यावे, या हेतूने मंडळाने यंदाही परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जातील.